पवनी येथील वैजेश्वर वार्ड क्रमांक २ मध्ये राहणाऱ्या ५२ वर्षीय माणिक कोंदूजी मांढरे यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, माणिक मांढरे हे २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० ते ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी दारूच्या नशेत सायकल उभी करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते डोक्यावर जोरात आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मुका मार लागल्याने प्रकृती खालावली.