रत्नागिरी: ओबीसी आरक्षण बचावासाठी हजारो कुणबी बांधवानी मोर्चा काढत तहसीलदारांना दिले निवेदन
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरी ओबीसी कुणबी समाजाने सोमवारी १५ सप्टेंबर रोजी तीव्र निर्देशने केली. कुणबी समाज उन्नती संग मुंबई यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी कुणबी बांधव, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.