बुलढाणा: नळगंगा प्रकल्पाचे ५ गेट ४ इंचाने उघडल्याने नळगंगा नदीला पूर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
नळगंगा प्रकल्पामध्ये सतत वाढ होणाऱ्या पाण्यामुळे नळगंगा प्रकल्प विभागाने २ नोव्हेंबर रोजी ५ गेटमधून ४ इंच पाणी सोडल्याने नळगंगा नदीला पुर आला होता. तर पुन्हा प्रकल्पामध्ये पाण्याची वाढ झाल्यास नदी पात्रात पुन्हा विसर्ग सुरूच राहणार असल्याचे नळगंगा प्रकल्प विभागाने कळविले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहवे, असे आवाहन नळगंगा प्रकल्पाचे सतीष पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता केले आहे.