शिरपूर: तालुक्यातील पळासनेरजवळ मुंबई–आग्रा महामार्गावर भीषण अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली
Shirpur, Dhule | Nov 7, 2025 मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास एम.पी. -०९ ZF-८९९७ क्रमांकाची चारचाकी कार ही मध्यप्रदेशातील ठिकरी येथून जालना येथे जात असताना शिरपूर तालुक्यातील पळासनेरलगत चारण पाडा परिसरात भरधाव वेगात येणाऱ्या KA-५१ AC-६१७२ क्रमांकाच्या आयशरने मागून जोराची धडक दिली.सुदैवाने कोणतीही जीवितहानीझाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. पुढील कारवाई तालुका पोलीस करीत आहे.