विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात जिल्ह्यातील 50 लाभार्थ्यांना न्यायाधीशांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात आला.