चुंचाळे गावाच्या फाट्याजवळ भुसावळ येथील वसुली कर्मचारी किरण पाटील यांची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून २४ लाखाची रोकड लांबवली होती तेव्हा या गुन्ह्यात पाच संशयतांना जळगाव जिल्हा गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने पकडले होते हे सर्व संशयित यावल पोलीस कोठडीत होते. त्यांची पोलीस कुठली संपल्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा यावल न्यायालयात हजर केले असता या सर्व पाच संशयीतांना ९ जानेवारीपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.