औंढा नागनाथ: सिद्धेश्वर धरणातून रब्बीसाठी 4 पाणी पाळ्याचा निर्णय, हिंगोली,नांदेड,परभणी जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून रब्बीच्या पिकासाठी कॅनॉल द्वारे चार पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय पूर्णा पाटबंधारे विभागाने घेतला पहिली पाणी पाळी दिनांक 25 नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत, दुसरी पाणी पाणी 19 डिसेंबर ते 11 जानेवारी 2026 पर्यंत, तिसरी पाणी 12 जानेवारी ते 4 फेब्रुवारी व चौथी पाणी पाळी 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत देण्यात येणार आहे यामुळे नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील साठ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली