चांदूर बाजार: चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील नानोरी येथे, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
आज दिनांक 24 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील नानोरी येथे, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याप्रकरणी पवन अवधूतराव मनोहरे यांनी दिनांक 23 डिसेंबरला एक वाजून 30 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रार व मेडिकल सर्टिफिकेट वरून पोलिसांनी महिलांसहित एकूण 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे