पुणे शहर: दिवाळीत घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांत वाढ, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांचा संवाद
Pune City, Pune | Oct 22, 2025 पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. दिवाळीत घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र, नागिरकांनी सोशल मीडियावर घरा बाहेर गेल्याचे फोटो टाकणे टाळावे. या अतिउत्साहामुळे चोरांकडून रेकी केली जाते. अशी माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली.