पुणे शहर: पुणे विद्यापीठात अधिसभा बैठकीदरम्यान आंबेडकरी संघटनांची पोस्टरबाजी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या अधिसभा बैठकीदरम्यान आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात्मक पद्धतीने पोस्टरबाजी केली. मुख्य इमारत परिसरात लावण्यात आलेल्या या पोस्टरांमधून प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. संघटनांनी शुल्कवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, वसतिगृहांतील विविध समस्यांकडे विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले