खेड: तालुक्यातील बोरज शिवफाटा येथे सिंगल बॅरल काडतूस बंदूक बाळगल्याने दोघांना अटक
Khed, Ratnagiri | Apr 22, 2024 खेड तालुक्यातील बोरज शिवफाटा येथे सिंगल बॅरल काडतूस बंदूक व आठ जिवंत काडतुसे आढळल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता खेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनिल गुहागरकर व राजेश साळवी अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.