भारतीय राज्यघटनेबाबत जागृकता निर्माण व्हावी तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती उपेक्षित घटकास व्हावी,यासाठी घर घर संविधान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.नागरिकांना व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्यांबद्दल जागरूक करणे व त्यांचे हक्क व कर्तव्ये समजून देणे हा उद्देश आहे. त्यामुळे घर घर संविधान कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणीच्या सुचना सचिव दर्जाचे राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी सोम. दि. 10 नोव्हें. रोजी दु. 4 वा. दिल्या.