धुळे: 'आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा!'; कापडण्यात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे तालुक्यातील कापडणे गावात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीविरोधात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलं. ‘वाचवा वाचवा, आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा’ अशी आर्त हाक देत त्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गेल्या तीन महिन्यांत ४० नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याने भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी ग्रामसेविकेच्या खुर्चीवर निवेदन चिकटवलं आणि तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.