शिरपूर तालुक्यातील नवे लोंढरे येथे झोपेत असताना 42 वर्षीय युवकाचा झोपेत मृत्यू झाल्याची घटना 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जितेंद्र वल्लभ जमादार वय 42 असे मयत युवकाचे नाव आहे.सदर युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ मनोज पाटील करीत आहे.