अकोट: अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय कापूस खरेदीत कपाशीला 8 हजार 10 रुपये प्रति क्विंटलचा दर
Akot, Akola | Nov 28, 2025 अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सीसीआय कापूस खरेदीत कपाशीला कमाल 8010 प्रतिक्विंटलचा दर मिळाला असून किमान दर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला 7689 रुपये असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल आवक व जर भाव माहितीतील दैनिक अहवालानुसार प्राप्त झाले असून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कपाशीची सुमारे 1800 क्विंटल आवक झाली असून नजीकच्या काळात शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणी मुळे ही खरेदी आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहेत