महाड: विश्वकर्मा पांचाळ समाज सेवा मंडळ, रोहा-रायगड दमखाडी यांच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन
Mahad, Raigad | Sep 15, 2025 आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास विश्वकर्मा पांचाळ समाज सेवा मंडळ, रोहा-रायगड (दमखाडी) यांच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. या उपक्रमामुळे समाजातील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, तसेच समाजबांधवांना एकत्र येण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होईल. समाजाच्या प्रगतीसाठी अशा पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या उभारण्यासाठी पाठबळ देणं ही माझी नैतिक जबाबदारी मानतो.