करवीर: १५ वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस कडून फक्त भ्रष्टाचार- खासदार धनंजय महाडिक यांचा राजेंद्रनगरात गंभीर आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर राजेंद्र नगरातील प्रभाग क्रमांक 66 मधील दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली 15 वर्षात कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस सत्तेवर होती मात्र एकही काम समाज हिताचे केले नाही तर फक्त भ्रष्टाचार केल्याचा असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.