गोरेगाव: दुर्गामातेच्या अश्विन नवरात्र पर्वा साठी मुंडीपारमध्ये महिला कार्यकारिणीची स्थापना, दुर्गा मंदिर दुर्गा चौकात बैठक
मुंडीपारमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा संकल्प महिलांनी हाती घेतला आहे. सार्वजनिक दुर्गा मंदिर, दुर्गा चौक मुंडीपार येथे दुर्गामातेच्या आश्विन नवरात्र पर्वासाठी महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यकारणी घटित करण्यात आली यावेळी अध्यक्ष- अनुसयाताई रंहागडाले, उपाध्यक्ष- छाया चौधरी,ज्योती राऊत,शालू बिसेन, ललिता सोनवणे, सचिव- लता चौधरी आदी पदाचे गठन करण्यात आले.