कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण सोडत, मुख्याधिकारी जगताप
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाची आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय येथे सोडत काढण्यात आली असून कोपरगाव नगरपरिषदेसाठी ओबीसी हे आरक्षण सोडत नगराध्यक्ष पदासाठी निघाले आहे.,आज मुंबई मंत्रालयात दिवसभर आरक्षण सोडत काढण्यात आले असून यामुळे आता इच्छुक उमेदवारांना नगरपालिकेचे निवडणूक कधी लागणार याचीच आस लागली आहे.