गुप्त माहितीच्या आधारे लाखनी वनविभागाने धाडसी कारवाई करत लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला असून, या प्रकरणी चालकावर वनगुन्हा दाखल केला आहे. लाखनी येथे संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकची (क्रमांक MH35/K-5228) तपासणी केली असता, वाहतूक परवान्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सागाचे लाकूड त्यात भरलेले आढळले. कागदपत्रांनुसार केवळ ९ घनमीटर मालाची परवानगी असताना, गडेगाव आगार येथे नेऊन मोजमाप केले असता १५.१९ घनमीटर सागाचे नग व मोठ्या प्रमाणात जळावू लाकूड असा एकूण ७ लाख ७८ हजार ६४८ रुपयांचा