नांदेड: राडा...गोकुळनगर आठवडी बाजार स्थलांतर आदेश असताना रस्त्यावरच भरवला बाजार, पोलिस प्रशासन, शेतकरी आणि व्यापा-यात झटापट
Nanded, Nanded | Nov 28, 2025 नांदेड शहरातील आठवडी बाजारात राडा झाला असून नांदेड शहरातील गोकुळनगर शुक्रवार आठवडी बाजारात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवार बाजारातील व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना सूचना देऊन रस्त्यावर भरविण्यात येणारा बाजार स्थलांतर करण्याचे आदेश दिले असताना त्यावरून आज शुक्रवारी शुक्रवार बाजारामध्ये शेतकरी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावरच सुरू केल्याचे पाहताच पोलीस प्रशासनाने ती दुकाने उडविण्याचा प्रयत्न केला असता बाचाबाची झाली.