साकोली: निलज येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तलावात कमळाची फुले काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
साकोली तालुक्यातील निलज येथील प्रतीक सुखदेव शेंडे वय19 हा मंगळवार दि.21 ऑक्टोबरला सायंकाळी6.30 वाजता दोन मित्रांसोबत घरी लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले आणण्यासाठी तलावात केला असता या तरुणाचा पाण्यात बुडूनमृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवार दि.22 ऑक्टोबरला सकाळी11 वाजता पोस्टमार्टम करण्यात आले असून मृत्यूचा मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रतीकच्या जाण्याने गरीब आई-वडिलांचा आधार गेला आहे.शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त लालचंद लोथे यांनी केली आहे