बाबुळगाव तालुक्यातील अंतरगाव व दिघी 2 या दोन लगतच्या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. अंतरगाव येथील राजेंद्र बिडकर यांच्या घरी सशस्त्र तीन चोर घुसले पण म्हाताऱ्या पती-पत्नीकडून काहीच मिळाले नाही. त्यानंतर दिघी दोन येतील पराग पिसे यांच्या जुन्या घरामध्ये चाचपणी करून 3000 रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.