आज दिनांक दहा डिसेंबरला पोलिस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहर तथा परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास मोर्शी पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासा दरम्यान दिनांक 9 डिसेंबरला 11 वाजता चे दरम्यान त्याचे ताब्यातून आणखी चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. आरोपी लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे याला अटक करण्यात आली असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळते