आज दि.11 जानेवारी 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पतंगाच्या धाग्यात मुख्य रोडवर अडकलेल्या कबुतराला एका तरुणाने जीवनदान दिले आहे, एक ते दीड तासापासून हे कबूतर पतंगाच्या धाग्यात अडकले होते व मरण यातना भोगत होते,यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणाला ही घटना दिसून आली त्यांनी तात्काळ मुख्य रोडवर वाहणारी ट्रक थांबवले व ट्रकवर चढून जीव मुठीत धरून या कबुतराला वाचविले आहे, हा साध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.