भाजप महायुतीच्या वावंजे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कमला देशेकर आणि चिंध्रण पंचायत समिती गणाचे उमेदवार अंकुश खैर यांच्या प्रचारार्थ सध्या मतदारसंघात झंझावात सुरू आहे. या प्रचार मोहिमेअंतर्गत सोमवारी खेरवाडी आणि करंबेली या वाड्यांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.