साथरोग आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज जिल्हास्तरीय संसर्गजन्य प्रतिबंध समिती गठीत
Dharashiv, Dharavshiv | Sep 5, 2024
धाराशिव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.त्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला राज्य शासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात किटकजन्य,जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.समितीची बैठक आज दि.5 सप्टेंबर रोजी दु.3 वा.संपन्न झाली