बुलढाणा जिल्ह्यातील सुकळी येथे २३ आक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर,युवानेते निरज रायमुलकर आदी उपस्थित होते.