जालना शहरातील बायपास रोडवरील कलावती हॉस्पीटल समोर सागर धानुरे यांच्या मृत्युचं गुढ उकलण्यासाठी पोलीसांनी मोठी कसरत केली. परंतु, पोलीसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचे सत्य समोर आणले. सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजात मिळालेल्या माहितीनुसार पैशाच्या व्यवहारातून सागर धानुरेचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न केले. सुरुवातीला आत्महत्या वाटणारी घटना खून असल्याचे पोलीसांनी उघड केले. त्यामुळे पोलीसांबरोबर जालनेकरही अचंबीत झाले.आत्महत्येचा बनाव बनवून निघून गेला होता.