शिरूर: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील जांबुत येथील घटना, परिसरात हळहळ
Shirur, Pune | Oct 22, 2025 शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा हौदोस सुरूच असून आठ दिवसापूर्वी पिंपरखेड (ता.शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज बुधवार (दि.२२) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जांबुत (ता.शिरूर) थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव या ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.