हिंगणघाट येथे पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा घातक परिणाम समोर आला आहे. सर्वत्र बंदी असतानाही काही बेफिकीर पतंगबाज अजूनही या जीवघेण्या मांजाचा वापर करत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना रेल्वे पुलाजवळ घडली, ज्यात कोसारा येथील सुशील वामनराव शिरसागर हे गंभीर जखमी झाले. दवाखान्याच्या कामानिमित्त हिंगणघाटला येत असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला वेढला. सुशील यांनी तत्परतेने मांजा हातात पकडून जीव वाचवला, मात्र त्यात त्यांच्या हाताला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली.