नवेगावबांध येथे झालेल्या अपघातात दोन तरूण जखमी झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. नरेश माणीक नाईक (२८) व संतोष आनंदराव सोनवाने (२०) रा. नवेगावबांध अशी जखमींची नावे आहेत. त्यांचा प्रथमोपचार नवेगावबांधच्या ग्रामीण रूग्णालयात केल्यावर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.