पाटोदा शहरातील बस स्थानकाच्या उभारणीत महत्त्वाची भर घालत महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून तब्बल चार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.ही मंजुरी मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांनी वारंवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाटोदा बस स्थानकाच्या आवश्यक कामांसाठी निधी मंजुरीचा प्रस्ताव पुढे रेटला होता. अखेर त्यांचा पाठपुरावा फलदायी ठरला असून पाटोद्यासाठी हा मोठा विकासात्मक निर्णय ठरला आहे.