जाफराबाद: परतीच्या पावसाने भोकरदन जाफराबाद तालुक्यात धावडा,माहोरा,वडोद तांगडा,सिपोरा या भागात मका पिकाचे नुकसान
आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद तालुक्यातील धावडा ,माहोरा ,वडोद तांगडा ,सिपोरा आंभोरा या गावात परतीच्या पावसाने अतोनात खरीप पिकांचे नुकसान केले आहे कारण 2/3 दिवसापासून या भागात सतत परतीचा पाऊस पडत आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात असलेली मका पीक सोगुन ठेवली आहे,यात हे पूर्ण कंणस पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांच नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाल्याचे चित्र या भोकरदन जाफराबाद दोन्ही तालुक्यात पाहायला मिळत आहे.