गोंदिया: अवैध दारू अड्ड्यावर धाड; १८ लिटर दारू जप्त, आसोली येथील घटना
ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आसोली येथील उर्मीला छन्नू मौजे (५५) या महिलेच्या घरून १८ लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस हवालदार आनंद धुवारे यांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ३ हजार ६०० रुपये सांगितली जाते. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.