उदगीर देगलूर रोडवर दोन दुचाकीची धडक झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी सांयकाळी घडली आहे,या अपघातात एक जण किरकोळ जखमी झालाय,सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर देगलूर रोडवर आयटीआय कॉलेज जवळ दोन दुचाकीची धडक झाली यात एक जण किरकोळ जखमी झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात उपचार करून जखमींना घरी पाठवण्यात आले, दुचाकींचा अपघात झाल्या ठिकाणी त्याच जागेवर दोन दिवसांपूर्वी एसटी व ट्रॅक्टरचा अपघात होवून एसटी बस मधील दोघे प्रवाशी जखमी झाले होते