भारत के रंग, नारी के संग या टॅग लाईन अंतर्गत आपल्या कारमधून संपूर्ण भारत देशाची परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करीत बुधवार दिनांक 24 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान रामटेक शहरातील डॉ. अंशुजा किंमतकर व सौ लक्ष्मी माथरे या दोन धाडसी महिला 84 दिवसांच्या प्रवासानंतर रामटेकला पोहोचल्या. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले अनुभव ही कथन केले.