पिंपरा शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून बेला पोलिसांनी महसूल विभागासह संयुक्त कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी टाटा टिप्पर पकडला असून, त्यात ३ ब्रास अवैध वाळू आढळून आली.. पोलिसांनी २० लाख रुपये किमतीचा टिप्पर व १५ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण मुद्देमाल: २०,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.