आमगाव: तिगाव येथे भीषण आग – नानू हरीणखेडे यांचे घर जळून खाक, लाखोंचे नुकसान
Amgaon, Gondia | Nov 8, 2025 आमगाव तालुक्यातील ग्राम तिगाव येथे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे एक वाजता दुर्दैवी घटना घडली. ग्रामस्थ नानू हरीणखेडे यांच्या घराला अचानकपणे आग लागून काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.घटनास्थळी तात्काळ अग्निशमन विभागाचे दल दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, दोन तरुणांनी घराच्या छपरावर चढून मोटरने पाणी टाकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे आगीच