अर्जुनी मोरगाव: केशोरी,अर्जुनी मोरगाव,सौंदळ सडक अर्जुनी येथे सेवा पंधरवाडा साजरा करण्यासंबंधित बैठक संपन्न
भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोरगाव विधानसभेतील केशोरी, अर्जुनी मोरगाव,सौंदळ व सडक अर्जुनी मंडळांची सेवा पंधरवाडा साजरा करण्यासंबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या जन्मदिवशी भाजपाकडून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून देशभरात सेवा दिवस व सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे.