शिरूर: शिरूर येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणास अटक; 72 हजारांचा मुद्देमाल जप्त
Shirur, Pune | Sep 15, 2025 शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मॅफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणास अटक केली आहे. आरोपीकडून 2.8 ग्रॅम मॅफेड्रोन आणि स्कुटीसह एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पवन सागर भंडारे (वय 19, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.