चिखली: मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण; मेहकर येथील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार
शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना धड राहण्याची सुविधा आणि चांगले जेवण मिळत नाही, ही धक्कादायक बाब मेहकर येथे उघडकीस आली आहे. मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मेहेकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.