कुडाळ: झाराप येथील बँक ऑफ इंडिया एटीएम फोडी प्रकरणातील पाच आरोपींना २४ तासात अटक : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर
झाराप येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडी प्रकरणातील पाच संशयित आरोपींच्या मुसक्या जिल्हा पोलीस दलाने केवळ २४ तासांच्या आत आवळल्या आहेत. संशयित हे १९ ते २९ वयोगातील असून पाचही संशयितांना इंदापूर पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून विविध बँकांचे २७ एटीएम कार्ड, ४ मोबाईल फोन, इंटिंगा कार, पल्सर मोटारसायकल, ऑक्सिजन सिलेंडर, एलपीजी सिलेंडर, गॅस कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी शनिवारी ओरोस येथे दिली.