पैठण: चोरीस गेलेले सात मोबाईल पाचोड पोलीसांनी छडा लावून मूळ मालकाला दिले परत
पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये वर्षभरामध्ये आठवडी बाजारासह विविध ठिकाणाहून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत याप्रकरणी तक्रारी दाखल केलेले आहेत यापैकी 83 हजार रुपये किमतीच्या सात मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले आहे दरम्यान पाचोड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व अंमलदार कृष्णा बरबडे यांनी सीईआर पोर्टलच्या साह्याने हरवलेले सात मोबाईल शोधले यावेळी पाटील म्हणाले की सी आय आर प्रणालीमुळे मोबाईल चोरीला गेल्यास तो ब्लॉक करता येतो