कारंजा: आ. सईताई डहाके यांच्या प्रयत्नांना यश! अकोला परिवहन विभागाच्या बिंदू नामावलीचा रखडलेला विषय मुंबई येथे मार्गस्थ
Karanja, Washim | Oct 17, 2025 राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाची बिंदू नामावली अद्यावत नसल्यामुळे अधिकारी कर्मचारी यांच्या भरती प्रक्रिया पदोन्नती तसेच बदली यामध्ये अडचणी येत होत्या. त्या सोडविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून थेट राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांना साकडे घातले होते.