अमळनेर: कडगाव गावात दोन ठिकाणी घरफोडी; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कडगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी होऊन रोख २२ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.