सांगोला: पूर व अतिवृष्टीने केले शेतीचे मोठे नुकसान; सांगोल्यात हजारो शेतकऱ्यांची कंबर मोडली; कृषी कार्यालयात संवाद
सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी 30 सप्टें. सायं 6.30 च्या सुमारास माहिती दिली. आतापर्यंत २९,३१६ हेक्टर शेतपिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल कृषी विभागाकडे जमा करण्यात आला आहे. हे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीमार्फत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास ग्रामसमितीकडे संपर्क साधून पंचनामा करून घेण्याचे आवाहन केले आहे.