नांदेड: निवडणूक होत असलेल्या शहरात प्रत्येक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश - जिल्हाधिकारी कार्यालय
Nanded, Nanded | Nov 29, 2025 जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. 2 डिसेंबर रोजी रोजी सर्व मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज रोजी दुपारी 3च्या सुमारास निर्गमित केले आहेत. नगरपरिषद तथा नगरपंचायत निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत हा आदेश अमलात राहणार आहे.