कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील विविध गावातील पिकांच्या नुकसानीचीखासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनील केदार यांनी केली पाहणी
कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी, तेलगाव, तेलकामठी, तिष्टी तसेच सावनेर तालुक्यातील सालई आणि नांदागोमुख गावात २६ सप्टेंबर २०२५ रोजी आलेल्या वादळांमुळे व अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे व संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी दि. २८ सप्टेंबर रोजी रामटेक मतदार क्षेत्राचे लोकसभा सदस्य मा. श्री श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री मा. श्री सुनील केदार यांनी केली. या पाहणीचे वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते