मेहकर: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जमिनींसाठी 7.80 कोटी रुपये मंजूर आमदार खरात यांच्या प्रयत्नांना यश
मेहकर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या व गाळ वाहून आल्यामुळे नुकसान झालेल्या जमिनीसाठी ७.८० कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर : आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला आले यश.२५ जून रोजी मेहकर तालुक्यातील सर्वांच्या सर्व ११ मंडळे व लोणार तालुक्यातील ५ मंडळात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजार हेक्टर वरील जमिनीचे नुकसान झाले . या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले व शेतक-यांची पेरणी वाया गेली.